मोठी बातमी! भारताचा कॅनडाला आणखी एक धक्का

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला चांगलच सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्रालय म्हणाले की, “कॅनडाने भारतावर केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरशी संबंधित कोणतीही माहिती आमच्याशी शेअर केलेली नाही. कॅनडाने केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.”
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी होणाऱ्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत कॅनडाबाबत सविस्तर चर्चा केली. यादरम्यान ते म्हणाले की, “हो, आम्ही कॅनडाच्या सरकारला सांगितले की आमच्या परस्पर राजनैतिक उपस्थितीत समानता असली पाहिजे. त्यांची संख्या कॅनडातील आमच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे कॅनडाच्या काही अधिकाऱ्यांना भारत सोडावा लागेल.”
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी भारतावर हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप संसदेत केला होता. भारत सरकारने कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कॅनडाच्या या कोणत्याही पुराव्याविना लावण्यात आलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडातील संबंध बिघाडले आहेत.