भारतात रक्तपात घडवून कॅनडामध्ये मजा करत आहेत ‘हे’ 11 गँगस्टर

कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव वाढत आहे. दरम्यान, बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 11 कुख्यात गुंडांची यादी त्यांच्या फोटोंसह जारी केली आहे. हे गुंड भारतातून पलायन करून कॅनडामध्ये राहत आहेत, तेथून ते पंजाबसह देशातील इतर राज्यांमध्ये कट रचत असतात. त्याचबरोबर ते कॅनडामध्ये अतिशय आरामदायी जीवन जगत असून त्यांना कायद्याची भीती नाहीय.

एनआयएने जाहीर केलेल्या यादीत पहिले नाव गँगस्टर गोल्डी ब्रारचे आहे. त्याने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या केली होती. यानंतर तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श डल्ला, दरमन सिंग काहलॉन, लखबीर सिंग, दिनेश शर्मा उर्फ ​​गांधी, नीरज उर्फ ​​पंडित, गुरपिंदर, सुखदुल, गौरव पटियाल उर्फ ​​सौरभ गँगस्टर दलेर सिंग यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

एनआयएचे म्हणणे आहे की खून, खंडणी याशिवाय या कुख्यात गुंडांवर पाकिस्तानच्या प्रेरणेने देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. त्यापैकी बहुतांश कॅनडामध्ये लपलेले आहेत. NIA ने सांगितले की, 11 गुंडांपैकी 7 A श्रेणीचे गुन्हेगार आहेत, जे पंजाबमध्ये गुन्हे करून फरार झाले आहेत. हे सर्व गुन्हेगार कॅनडात चैनीचे जीवन जगत असून, तेथे ते खलिस्तानीसह तरुणांची दिशाभूल करत आहेत. त्याचबरोबर त्यांना गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलत आहे.

शिख फॉर जस्टिस, खलिस्तान टायगर फोर्स, वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशन, बब्बर खलिस्तान इंटरनॅशनल यासह नऊ फुटीरतावादी संघटना कॅनडात भारताविरुद्ध कट रचण्यात सहभागी आहेत. या सर्व संघटनांचे दहशतवाद आणि कुख्यात दहशतवाद्यांशी संबंध आहेत. या संघटनांचे नेते कुख्यात दहशतवादी आहेत, असेही म्हणता येईल. त्याच वेळी, पंजाब पोलिसांच्या विनंतीवरून, इंटरपोलने ब्रार आणि डल्ला यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) आधीच जारी केली आहे.

ब्रार हा मूळचा मुक्तसर साहिबचा रहिवासी असून तो 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला पळून गेला होता आणि तो अनेक दहशतवादी कारवाया आणि खंडणीमध्ये गुंतलेल्या तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सदस्य होता. गेल्या वर्षी 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारीही त्याने स्वीकारली होती.