भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हन ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. भारताचा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 39 षटकात 3 बाद 289 धावांपर्यंत पोहचवले. त्याला इशान किशनने देखील चांगली साथ दिली. शुभमन गिलने आपले वनडेमधील सहावे शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे यासाठी फक्त त्याने 35 डाव खेळले. श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरत दमदार कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. शुभमन गिलसोबत 200 धावांची भागीदारी रचल्यानंतर तो 90 चेंडूत 105 धावा केल्या.