भारताला आत्मनिर्भर, विकसित करण्यासाठी सुशिक्षित युवकांचे मत महत्त्वाचे !

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच भाग म्हणून नुकतेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विध्यार्थी, प्राध्यापक व प्रध्यापकेतर कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी म्हटले कि, २०२४ भारतीयांसाठी महत्त्वाचे वर्ष आहे! या वर्षी आपण लोकशाहीचे सर्वात मोठे पर्व साजरे करणार आहोत. तुम्ही सर्व देखील या पर्वात आवर्जून सहभागी व्हा! निवडणुकीत मत देणे हा केवळ आपला अधिकार नसून, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ! प्रत्येक मतदाराचे मत हे महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सर्व अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी आपल्या प्रास्ताविकेत प्रत्येक विद्यार्थ्याने मतदानाचे कर्तव्य बजावावे यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन हे महाविद्यालयात करणे महत्वाचे असून प्रत्येक पाच वर्षांनी आपल्याला लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला हक्क बजावण्याची संधी येते त्यामुळे मतदान करून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले.

या नंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाल्या कि, प्रत्येक निवडणूक एक मोठी शक्यता असते. प्रत्येक नागरिकाला गेल्या पाच वर्षांचे मूल्यमापन करण्याची आणि जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे मतदान करण्याची ही संधी आहे त्यामुळे त्या संधीकडे पाठ फिरवणे योग्य ठरणार नाही प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे आणि तसा संकल्प केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या उपक्रमात उपस्थित विध्यार्थी व कर्मचाऱ्याकडून भविष्यात येणार्‍या सर्व निवडणुकीसाठी मतदानाचा करण्याचा संकल्प येथे करण्यात आला.