भारतीय डाक विभागात जम्बो भरती ; दहावी उत्तीर्णांना मिळेल 63,200 पगार 

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. भारतीय डाक विभागाकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे. विशेष दहावी उत्तीर्णांसाठी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. इच्छुक उमेदवारांना indiapost.gov.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल.

पदाचे नाव आणि पात्रता :

ही भरती ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांसाठी राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेव्दारे एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण. असावा सोबतच  Driving Licens+ हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- ते 63,200/- पर्यंत पगार मिळेल

निवड प्रक्रिया:

स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

असा करा अर्ज

उमेदवारांना हार्ड कॉपी कागदपत्रांसह व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा