भारतीय नौदलात अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदांसाठी भरती निघाली आहे. पदवीधरांना ही मोठी संधी असू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावा.
या भरतीद्वारे एकूण 254 जागा भरल्या जातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
रिक्त पदांचा तपशील :
एक्झिक्युटिव ब्रांच
1) SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) 50
2) SSC पायलट 20
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 18
4) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 08
5) SSC लॉजिस्टिक्स 30
6) SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) 10
एज्युकेशन ब्रांच
7) SSC एज्युकेशन 18
टेक्निकल ब्रांच
8) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 30
9) SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 50
10) नेव्हल कन्स्ट्रक्टर 20
शैक्षणिक पात्रता:
एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
वय मर्यादा : उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2000 ते 1 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा.
पगार किती मिळेल?
या पदावर रुजू झाल्यानंतर मूळ वेतन 56100 रुपये प्रति महिना असेल. यासोबतच इतर अनेक भत्तेही मिळतील.