भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
येत्या २६ ऑगस्ट २०२३ पासून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे
आवश्यक पात्रता : १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
अर्ज फी :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
निवड प्रकीर्या :
या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून त्याचे अपशिल वरील लिंक मध्ये दिलेले आहेत. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
नोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार आणि संपूर्ण भारत.
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार : 18000/- ते 56900/- रुपये
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळ्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर फेटाळण्यात येतील अशी सूचना इंडियन नेव्हीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा