तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न जवळपास सगळेच बघत असतात. पण हे स्वप्न कोणाचं पूर्ण होत तर कुणाचं नाही होत. देशभरातील तरुण मुलींसाठी भारतीय लष्कर लवकरच ४१८२२ पदांसाठी अधिसूचना करणार आहे. यासाठी १०वी तसेच १२वी पास मुली ऑनलाईन अर्ज करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
या भरती मोहिमेअंतर्गत, स्टोअर कीपर, मल्टी टास्किंग स्टाफ, मेट आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. आर्मी रिक्रूटमेंट २०२३ चे स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुलींसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक निकष, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
भारतीय सैन्य भरती २०२३ साठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी आणि १२वी उत्तीर्ण असावा. भारतीय सैन्य भरती २०२३ साठी पात्र आणि इच्छुक तरुण मुली विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अधिसूचना जारी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज करू शकतात.