भारत आणि रशियाची मैत्री पाहून हादरणार चीन; आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ‘भारत’

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. केवळ जुलै महिन्यात भारताने रशियाकडून US$2.8 अब्ज किमतीचे कच्चे तेल खरेदी केले आहे, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोपीय देश रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून दूर आहे. अशा परिस्थितीत रशियाने तेलावर सवलत देण्यास सुरुवात केलीय. युद्धापूर्वी भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेच्या फक्त एक टक्क्याहून कमी तेलाची आयात रशियाकडून करत असे, आता भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या ४० टक्के रशियाकडून आयात करतोय.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) ने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, चीनने रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी 47 टक्के खरेदी केली आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याने ३७ टक्के, युरोपियन युनियनने ७ टक्के आणि तुर्कीने ६ टक्के तेल रशियाकडून खरेदी केले आहे.

या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारत रशियाकडून केवळ कच्च्या तेलाचीच आयात करत नाही तर इतरही अनेक गोष्टींची आयात करतो. CREA च्या अहवालानुसार रशियाकडून कोळसा खरेदी करण्यातही भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 5 डिसेंबर 2022 ते जुलै 2024 पर्यंत, चीनने रशियाच्या एकूण कोळशाच्या निर्यातीपैकी 45 टक्के, त्यानंतर भारताने 18 टक्के, तुर्कीने 10 टक्के, दक्षिण कोरियाने 10 टक्के आणि तैवानने 5 टक्के खरेदी केली.

जीवाश्म इंधनाच्या आयातीत भारत-चीन आघाडीवर
रशियाकडून जीवाश्म इंधन आयात करण्यात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. रशियाच्या जीवाश्म इंधनाच्या निर्यातीपैकी 43 टक्के चीनने खरेदी केली. जुलैमध्ये भारत रशियन जीवाश्म इंधनाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे

भारत किती तेल खरेदी करतो ?
आपल्या तेलाची गरज भागवण्यासाठी भारत त्यातील ८५ टक्के तेल इतर देशांकडून आयात करतो. भारताने जुलैमध्ये 19.4 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, ज्याची किंमत US $ 11.4 अब्ज होती. जुलैमध्ये, ब्रेंट क्रूडच्या तुलनेत रशियन उरल क्रूडवरील सूट महिन्या-दर-महिना 9 टक्क्यांवरून 16.76 टक्के यूएस डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढली. ESPO ग्रेड आणि Sokol Brent वर सवलत US$ 4.23 आणि US$ 6.11 प्रति बॅरल आहे.