भारत कॅनडातील तणावाचा ३० कंपन्यांवर परिणाम?

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। भारत आणि कॅनडातील तणावाचा परिणाम कॅनडातील ३० भारतीय कंपन्यांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कम्पन्यांची कॅनडात ४०.४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. असे फ्रॉम इंडिया टू कॅनडा इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट नावाच्या अहवालात म्हटले आहे. तणावापूर्वी कॅनडातील भारतीय कंपन्यांनी भविष्यात नाविन्यपूर्णतेसाठी निधी वाढवण्याची अपेक्षा ही व्यक्त केली होती असे या अहवालात म्हटले आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत कॅनडा नवव्या स्थानावर आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यावधींचे करार आहे. या वादामुळे कॅनडात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आणि त्यांच्याकडून तिथे केलेल्या प्रचंड व गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास ही भारतीय कंपन्यांसाठी नव्हे तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरेल.

कारण या कंपन्यांमध्ये कानडातील हजारो लोक काम करतात कॅनडासाठी भारतीय कंपन्यांचे महत्त्व काय आहे आणि या कंपन्यांची तिथे किती मोठे गुंतवणूक आहे त्या संदर्भात याच वर्षी मे मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात आकडेवारी सविस्तर माहिती देण्यात आली होती. कन्फड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात सीआयआयने अहवाल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल टोरोंटो दौऱ्यावर असताना प्रसिद्ध केला होता.

सीआयआयच्या या अहवालात  भारत केवळ श्रीलंका बांगलादेश नेपाळ आखाती देशांसाठीच नाही तर कॅनडासारख्या देशांसाठी किती महत्त्वाचा आहे हे आकडेवारी सह अधोरेखित करण्यात आले. कॅनडाचा अर्थव्यवस्थेत भारतीय कौशल्यांचे योगदान आणि कॅनडातील भारतीय गुंतवणूक काढण्याचे अहवालात म्हटले आहे. सोबतच कॅनडात भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती आणि एफडीआय रोजगार निर्मितीमध्ये भारतीय कंपन्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला होता.

कॅनडामध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून सतरा हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. या कंपन्यांचा संशोधन आणि विकासावरील खर्च 700 दशलक्ष कॅनडियन डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. या अहवालात म्हटले आहे की कॅनडात भारतीय व्यवसाय वाढत आहे जे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे आता भारत आणि कॅनडातील तणाव वाढू लागल्याने तिथे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.