तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। आयसीसीने २०२४ च्या टी -२० विश्वचषकासाठी बुधवारी आयोजन स्थळांची घोषणा केली. त्यानुसार भारत पाकिस्तान यांच्यात महामुकाबला न्यूयॉर्क शहरात आयोजित केला जाईल. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे विश्वचषकाचे साहयजमान आहेत. २०२२ ला ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली आयोजित टी- २० विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना मेलबोर्नमध्ये झाला होता.
क्रिकब्झच्या वृत्तानुसार आयसीसी आणि न्यूयॉर्क शहरातील अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली त्यानुसार सविस्तर घोषणा केली जाईल. आयसीसीने डल्लास फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या तीन शहरांची आयसीसी पुरुष टी – २० विश्वचषक २०२४ साठी आयोजक म्हणून निवड केली. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हि मोठी क्रिकेट स्पर्धा होईल.
आयसीसीचे सीईओ एलाड्रिस म्हणाले, अमेरिकेत पहिल्यांदा इतकी मोठी स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. यात २० संघ सहभागी होतील. यानिमित्त जगातील मोठा आणि महत्वाचा भाग आर्थिक बाजार म्हणून काबीज करता येणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी देखील ही मोठी पर्वणी असेल