‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागताच ‘सरपंच तरी होतील का’ म्हणत काढली इज्जत

नाशिक : ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून अनेकांचे नाव चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांचेही बॅनर लागले होते. त्यात आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची भर पडली आहे. राज्यातील काही ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली.

त्र्यंबकेश्वर येथे मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या लागलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.