भुसावळ : शहरातील ‘प्रवीण नायसे’ या युवा लेखकाला ११ फेब्रुवारी ला महामहीम राष्ट्रपती द्रोपदि मुर्मु यांच्याशी संवाद साधण्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे.
या युवकाचे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक हे पुस्तक राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (National Book Trust, India) या भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या विभागाद्वारे आयोजित विश्व पुस्तक मेळावा (World Book fair 2023) या ठिकाणी २५ फेब्रुवारी २०२३ ला फ्रान्सच्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका ॲनी अरनॉक्स तसेच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते युवा लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. तेथे राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत येथील सर्व पदाधिकारी तसेच फ्रान्स देशाचे राजदूत उपस्थित होते.
देशातील २२ भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित झाले आहे. ११ रोजी देशातील ७५ युवा लेखकासोबत राष्ट्रपती संवाद साधणार आहेत. त्यात प्रवीण हा खानदेशातील एकमेव आहे. त्याचे पुस्तक अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे.