भुसावळमार्गे धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द, ५ गाड्यांच्या मार्गात बदल ; कारण घ्या जाणून

भुसावळ । भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावरून नाशिक मुंबईच्या दिशेनं रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच भुसावळ विभागातील चाळीसगाव स्थानकावर यार्ड रि मॉडेलिंगसाठी रेल्वे प्रशासनाने १६ एप्रिलला ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस १० रेल्वे गाड्या रद्द, ५ गाड्यांचे मार्ग बदल, तर ८ गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावतील.

ब्लॉक १६ एप्रिलला सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत अप व डाऊन मार्गावर राहील. यामुळे दोन्ही बाजूच्या गाड्या प्रभावित होतील. ब्लॉकच्या दिवशी जागा असेल त्या स्थानकांवर ८ गाड्या थांबवल्या जातील. यात डाऊन मार्गावरील गोवा एक्स्प्रेस १.३० साईनगर शिर्डी तास, – कालका एक्स्प्रेस १५ मिनिटे, एलटीटी गोड्डा एक्स्प्रेस २० मिनिटे, मुंबई- लखनऊ एक्स्प्रेस १५ मिनिटे, तर अप मार्गावरील जम्मूतवी- पुणे झेलम एक्स्प्रेस ४.१५ तास, गोवा एक्स्प्रेस २.२५ तास, गोरखपूर एलटीटी १.४५ तास, दिब्रुगढ एलटीटी १.४० तास थांबवला जाईल

या गाड्या रद्द
देवळाली – भुसावळ मेमू (१५ व १६), भुसावळ- देवळाली मेमू (१४ व १५), भुसावळ – इगतपुरी मेमू (१५ व १६), इगतपुरी – भुसावळ मेमू (१६ व १७), मुंबई – धुळे मेमू (१४ व १५), धुळे-मुंबई मेमू (१५ व १६), बडनेरा – – नाशिक मेमू (१४ व १६), नाशिक – बडनेरा मेमू (१४व १६), धुळे-चाळीसगाव मेमू १६ एप्रिलला रद्द असेल.

यांचा मार्ग बदल
बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, भुवनेश्वर – एलटीटी, पाटलीपुत्र-एलटीटी, गोरखपूर – पनवेल एक्स्प्रेस, छपरा – एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी (दि.१५) एप्रिलला जळगाव, उधना, वसई रोड, दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहे.