भुसावळ : राज्यातील 140 हून अधिक पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर, जि.अहमदनगर पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड तर मुक्ताईनगरात धुळे जातपडताळणी समितीचे राजकुमार शंकर शिंदे बदलून येत आहेत.
खान्देशातील बदली झालेले अधिकारी असे
नंदुरबार उपअधीक्षक सचिन प्रकाश हिरे यांची शिरपूर पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली असून पिंप्रीचिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिस्ले हे नंदुरबार पोलीस उपअधीक्षकपदी बदलून येत आहेत.
गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.
साक्री उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप भिवसेन मैराळे यांची नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली.
अमळनेर पोलीस उपअधीक्षक राकेश रावसाहेब जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली.
जळगाव मुख्यालयातील संदीप रघुनाथ गावीत यांची पाचोरा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे भास्कर प्रभाकर डेरे यांची पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.
सेवाज्येष्ठनेनुसार मिळालेली पदोन्नतीनुसार बदल्या अशा
रामराव माधवराव सोमवंशी यांना साक्री उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी तर साजन रुपलाल सोनावणे यांची अक्कलकुवा पोलीस उपअधीक्षकपदी सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्यात आली आहे.