भुसावळातील खंडणी प्रकरण : एका आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ : व्यापार्‍यांना धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना आरोपींना शनिवारी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केेल असता योगेश उर्फ सोनू हिरालाल मोघे याची न्यायालयीन कोठडीत तर रीतीक निदाने यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हत्याकांडातील आरोपीने धमकावून मागितली खंडणी
बुधवार, 17 मे रोजी खरात हत्याकांडातील संशयीत राजा मोघे यास न्यायालयीन तारखेवर आणल्यानंतर संशयिताने मोबाईलवरून हस्तकांच्या मध्यस्थीने गुजराथी स्वीट मार्टचे कपिल मेहता यांच्याकडे दहा हजारांची खंडणी मागितली होती तर गोपी मॉलचे रवींद्र झामनानी यांच्याकडेही 20 हजारांची खंडणी मागण्यात आली.
या प्रकरणी योगेश मोघे व रीतीक उर्फ गोलू निदाने यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

चार ठिकाणी खंडणी मागितल्याचे स्पष्ट
संशयितांनी महामार्गावरील एका हॉटेल चालकासह अशोक वाईन्समध्ये खंडणी मागण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित नसल्याने आरोपींचे संभाषण झाले नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे खंडणी बहाद्दराकडे कट्टा असल्याची माहिती व्यापार्‍यांनी पोलीस यंत्रणेला दिली असून त्या अनुषंगानेही आरोपीची आता पोलीस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.