भुसावळातील व्यापार्‍यांना धमकावून मागितली खंडणी : योगेश मोघेला जळगावातून अटक

भुसावळातील व्यापार्‍यांना धमकावून मागितली खंडणी ः योगेश मोघेला जळगावातून अटकशहरातील गुजराथी स्वीट मार्टचे कपिल गुजराथी यांना फोनवर धमकावून दहा हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या योगेश उर्फ हिरालाल सोनू मोघे (28, आगवाली चाळ, भुसावळ, ह.मु.हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यास जळगावच्या खोटे नगरातील बुधवारी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

यांनी केली कारवाई
गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रवी नरवाडे, संदीप सावळे, रणजीत जाधव, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने आरोपीला अटक करीत अधिक कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संशयित योगेश मोघेच्या अटकेनंतर व्यापार्‍यांकडे जावून खंडणी मागणारे संशयितदेखील लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे तर हत्याकांडातील संशयित कुणाच्या फोनवरून बोलला वा बोललाच नाही ते देखील स्पष्ट होणार आहे.