भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर भागातील तिघांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. ललित तुलसीदास खरारे (22), जितेंद्र आनंद बोयत (23) व पवन किसन खरारे (27, सर्व रा.वाल्मीक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी, नाईक संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली. आरोपी गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.