भुसावळ : पूर्व वैमनस्यातून शहरात झालेल्या गोळीबारानंतर कंडारी, ता.भुसावळ येथून मध्यरात्री संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. यापूर्वी वरणगाव येथून मुख्य संशयित करण संतोष सपकाळे याला अटक करण्यात आली होती. तिघा आरोपींना सोमवारी न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर यांनी केली. तपास निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.