---Advertisement---

भुसावळात गोळीबार, माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू; परिसरात खळबळ

---Advertisement---

भुसावळ : भुसावळ -जळगाव जुन्या रस्त्यावर पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. जुन्या वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील जुन्या सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या दोघांना पहिल्यांदा ट्रोमा केअर सेंटरमध्ये आणि नंतर शहरातील खाजगी रुग्णालय दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी दाव घेतली. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी शेत्रात शांतता राहिल्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा एकदा भुसावळ कोळीबाराने हादरले. या घटनेत दोघांचा बळी गेल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंतेचा विषय बनले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment