भुसावळ । भुसावळात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखानावर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या पथकाने धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली. याप्रकरणात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. विशाल शांताराम बर्हाटे व पल्लवी विशाल बर्हाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे आहे.
नेमका प्रकार काय?
भुसावळ शहरातील महेशनगरात माइंड अँड बॉडी स्क्रीन केअर स्पा या नावाखाली एक दाम्पत्य कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती यानंतर डीवायएसपींनी स्वतः अनोळखी क्रमांकावरून बऱ्हाटेला संपर्क साधला. बऱ्हाटे याने पिंगळे यांना मुलींचे छायाचित्र पाठवले, त्यातून बन्हाटे कुंटणखाना चालवत असल्याची खात्री होताच रविवारी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून कुंटणखान्यातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर येथील ५ मुलींची सुटका केली.
माइंड अँड बॉडी स्कीनकेअर स्पा या नावाने हा गोरखधंदा सुरू होता. याबाबत कुंटणखाना चालक विशाल शांताराम बर्हाटे व पल्लवी विशाल बर्हाटे या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे अनेक हायप्रोफाइल लोकांसोबत (ग्राहक) जुळल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.