भुसावळ । एकीकडे दिवाळीनंतर प्राण प्रवाशी कुटुंबासह परतीच्या मार्गावर असून यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र अशातच विविध विभागात तांत्रिक कारणामुळे गाड्या रद्द केल्या जात आहे. यात भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसरी लाईन सुरू करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला असून यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
या 24 एक्स्प्रेस गाड्या रद्द
12153 लोकमान्य टिळक टर्मिनस-राणी कमलापती एक्सप्रेस (7 डिसेंबर रोजी रद्द), 12154 राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (8 डिसेंबर रोजी रद्द), 12720 हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस (27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान रद्द), 12719 जयपूर-हैदराबाद एक्सप्रेस (29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान रद्द), 11079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस (7 डिसेंबर रोजी रद्द), 11080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (9 डिसेंबर रोजी रद्द), 12161 लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कँट एक्सप्रेस (8 डिसेंबर रोजी रद्द), 12162 आग्रा कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (9 डिसेंबर रोजी रद्द), 19483 अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस (27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर रोजी रद्द), 19484 बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस (27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर रोजी रद्द), 19435 अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस (30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत रद्द). 19436 आसनसोल-अहमदाबाद एक्स्प्रेस (2 डिसेंबर रोजी रद्द), 01431 पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस (8 डिसेंबर रोजी रद्द), 01432 गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस (8 डिसेंबर रोजी रद्द), 01025 दादर-बालिया विशेष प्रवास (6 व 8 डिसेंबर रोजी रद्द), 01026 बालिया-दादर विशेष एक्स्प्रेस (8 व 10 डिसेंबर रोजी रद्द), 01027 दादर-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस (7 डिसेंबर रोजी रद्द), 01028 गोरखपूर-दादर विशेष एक्स्प्रेस (9 डिसेंबर रोजी रद्द), 17020 हैदराबाद-हिसार एक्सप्रेस (2 डिसेंबर रोजी रद्द), 17019 हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस (5 डिसेंबर रोजी रद्द), 15065 गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस (7 व 8 डिसेंबर रोजी रद्द), 15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस (8 व 9 डिसेंबर रोजी रद्द), 01922 विरांगना लक्ष्मीबाई झाँसी-पुणे एक्स्प्रेस (6 डिसेंबर रोजी रद्द), 01921 पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झाँसी एक्स्प्रेस (7 डिसेंबर रोजी रद्द)
या आठ गाड्यांच्या मार्गात बदल
11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान तसेच 11407 पुणे-लखनौ एक्सप्रेस 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान, 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान, 12943 बलसाड-कानपूर एक्स्प्रेस 6 डिसेंबर रोजी इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावणार आहे. 11072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान तसेच 11408 लखनौ-पुणे एक्सप्रेस 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान, 22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 27 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान व 12944 कानपूर-बलसाड एक्सप्रेस 8 डिसेंबर रोजी कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे धावणार आहे.