भुसावळ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होता होत नसून अशातच भुसावळ शहर पुन्हा एका तरुणाच्या हत्येच्या घटनेने हादरले आहे. पूर्व वैमनस्यातून ३१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शहरातील खडका रोड परिसरात घडलीय. नाजीर शेख नशीर ( वय ३१) असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत थोडक्यात असं कि, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसर हादरला असून तरूणाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.