भूतविद्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

केरळमध्ये भूतविद्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सलीम मुसलियार असे आरोपीचे नाव आहे. ४९ वर्षीय सलीमने एका महिलेला सांगितले की जर तिने त्याचे ऐकले तर तो तिची समस्या सोडवेल. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सलीम मुस्लियार भूतबाधाद्वारे लोकांचे आजार बरे करण्याचा दावा करत असे.
हे प्रकरण केरळमधील अल्लाप्पुझा (अलेप्पी) येथील आहे. सलीम मुसलियारने त्या महिलेला कायमकुलम शहरातील आपल्या घरी बोलावून सांगितले की तो तिचा ‘रागाचा प्रश्न’ म्हणजेच जास्त रागाचा प्रश्न सोडवेल. यानंतर तो महिलेला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले आणि आता बरी होईल, असे सांगून तिला घरी पाठवले.
महिलेने सांगितले की, तिच्या एका नातेवाईकाने तिला उपचारासाठी मुसलियार कडे नेले होते, परंतु मुसलियारने तिच्यावर अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सलीमला अलप्पुझा जिल्ह्यातील मन्नादी मुस्लिम जमातजवळ असलेल्या दारूल फतिया पेरेथ हाऊसमधून अटक केली. पोलिसांनी त्याला कायमकुलम दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले, तेथून त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.