यावल : यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला भोजन ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना एसीबीने शुक्रवारी चार वाजता अटक केली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी वस्तीगृहाला तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 2021-22 वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता. त्यापोटी 73 लाखांचे बिल मंजूर होवून मिळालेदेखील मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली व त्यात 20 हजारात तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने आदिवासी कार्यालयातच लाच स्वीकारताच त्यास एसीबीकडे अटक केली.
भोजन पुरवठाकडून 20 हजारांची लाच घेताच लेखापालाला अटक : यावल आदिवासी विभागात खळबळ
by Ganesh Wagh
Published On: मे 26, 2023 4:52 pm

---Advertisement---