नंदुरबार : गेल्या काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा तेजस याच्या नावे असलेल्या ऑडी कारने तीन वाहनांना उडविल्याची घटना घडलीय. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. यातच अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले अनिल पाटील?
विरोधकांकडून नेत्याच्या मुलगा आहे, म्हणून टार्गेट केलं जाणं हे चुकीचे आहे. अपघात झाला हे चुकीचे आणि दुर्दैवाचा आहे. बावनकुळे यांनी माझा मुलगा असला तरी योग्य ती कारवाई केली पाहिजे; अशी प्रतिक्रिया दिली आहे. गाडीही तेजस बावनकुळे यांच्या नावाची आहे. मात्र त्यांची चुक नसेल तर त्यांना दोषी कसा धरावा; असे म्हणत अनिल पाटील यांनी तेजस बावनकुळे यांची पाठ राखण केली. तसेच पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करावी शासनाची ही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वर सर्वे तयार केला जाणाऱ्या सर्व्हेवरही भाष्य केलं. मुळात निवडणुकीच्या अगोदर व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वर सर्वे तयार करत असल्याने त्याला काही अर्थ नाही; असं ते म्हणाले.
तसेच भविष्यामध्ये युतीच्या मुख्यमंत्री राहणार. येणाऱ्या काळात पाच वर्षासाठी मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र जागा वाटप करण्याचे अधिकार तिघी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहे.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान होत आहे, त्याला बाहेर काढण्याचे काम सरकार करत आहे. अशी प्रतिक्रियाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली.