नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे मालेगाव दौर्यावर होते. त्याच दरम्यान त्यांच्या वाहनाला एका पीकअप गाडीने कट मारला होता. कट मारून त्या वाहनचालकाने पळ काढत गाडी जोरात पळवली. मात्र, त्याच वेळी दादा भुसे यांनी पोलिसांना त्या गाडीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर पोलिसांनी पीकअप गाडी रोखली. गाडीची चौकशी करत असतांना धक्कादायक बाब समोर आली. अवैध रित्या गोवंश मांस वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गाडीला एका पीकअप वाहनाने कट मारला होता. खरंतर दादा भुसे यांना गाडीने कट मारल्याने गाडी चालकावर संशय आला होता. पोलिसांचा ताफा असतांना कट मारण्याची इतकी हिंमत कशी काय झाली ? काही वेगळा कट आहे का? दारू पिऊन कुणी वाहन चालवत आहे का? असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित झाले होते.
सिनेस्टाईल पाठलाग करत दादा भुसे यांनी चौकशी करत असतांना धक्कादायक बाब समोर आल्याने त्यांच्यासह असलेल्या पोलिसांनाही धक्का बसला. कारण वाहनात अवैध रित्या गोवंश मांस वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहे.