मंदिरे होणार चकाचक; मिळणार २,४०० कोटी

तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। राज्यातील ४८० तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी २४०० कोटी रुपये खर्चाची योजना ग्रामविकास विभागामार्फत राबवली जाणार आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अ दर्जाची तीर्थक्षेत्रे ही तुलनेने अधिकदृष्ट्या सक्षम असतात तसेच त्यांना सरकारचा निधीही मुबलक प्रमाणात मिळतो. मात्र ज्याच्या तीर्थक्षेत्रांकडे आतापर्यंत तेवढे लक्ष दिले गेले नव्हते या निधीतून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय निवारे तयार करणे स्वच्छतेसाठीच्या उपाययोजना भक्तांना बसण्यासाठी चा जागा तयार करणे आदींचा समावेश असेल अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली. ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा निधी दिला जायचा आता त्यात अडीच पट वाढ केली जाणार आहे विकास कामात पारदर्शकता असावी यासाठी स्वतंत्र यंत्रणा वॉच ठेवणार आहे.

या तीर्थक्षेत्रांचा होणार विकास

हाजी मलंग (ठाणे), मांढरदेवी देवस्थान, श्री शेत्र गोंदवले, (पुसेगाव) शिखर शिंगणापूर सज्जनगड सातारा, श्री क्षेत्र जोतिबा श्री शेत्र नृसिंहवाडी, नरसिंह लक्ष्मी देवस्थान श्री सिद्धगिरी मठ कनेरी, श्री दत्त देवस्थान गगनगिरी, कोल्हापूर श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर, संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा तीर्थक्षेत्र पुणतांबा, श्री संजीवनी समाधी मंदिर पिंपळनेर, श्री कानिफनाथ मढी श्री शेत्र भगवानगड, जगन्नाथ देवी देवस्थान, श्री कानिफनाथ मंदिर अहमदनगर, घृष्णेश्वर देवस्थान औरंगाबाद, श्री महासिद्ध महाराज देवस्थान, श्री सुप्पोजी महासंस्थान वारी हनुमान, जिल्हा बुलढाणा, ऋणमोचन शेंडगाव नागरवाडी संत गुलाबराव महाराज संस्थान जिल्हा अमरावती, संत मुक्ताई मंदिर जळगाव, भैरवनाथ देवस्थान श्री शेत्र जकराया मंदिर जिल्हा कोल्हापूर, श्री पुंडलिक महाराज संस्थान, श्री रामचंद्र महाराज संस्थान जिल्हा अकोला