तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। महिलांना संसद आणि विधानसभा मध्ये 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक काही आरक्षण देणारे विधेयक काही सामान्य स्वरूपाचे नव्हते. नव्या भारताच्या नव्या लोकशाहीची वचनबद्धता त्यात होती. आणि केंद्रातील मजबूत आणि स्थिर सरकारमुळे ते विधेयक पारित करणे शक्य झाले असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित झाल्याबद्दल भाजपाच्या महिला मोर्चाच्या सदस्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रम करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले हे विधेयक स्थिर सरकारच्या इच्छाशक्तीमुळे पारित करणे शक्य झाले. मागील नऊ वर्षांच्या काळात या सरकारने बहुमत आणि स्त्रियांच्या बळावर अनेक महत्त्वाचे आणि लोकाभिमुख निर्णय घेतले.
भाजपा प्रणित सरकारला सलग दोन वेळा स्पष्ट बहुमत देऊन आपण कुठली चूक केली नाही अशी खात्री अनेकांना झाली आहे. संसद आणि राज्य विधानसभा मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे यावर मागील तीन दशकांपासून फक्त चर्चा सुरू होती. यापूर्वी या संदर्भात जे काही प्रयत्न झाले त्यात वचन पद्धतीचा अभाव होता. महिलांना अपमानित केले जायचे सरकारने तयार केलेल्या विधेयकांच्या प्रति फाडल्या जायच्या अशी टीका मोदी यांनी केली.
माझ्या सरकारच्या कारकिर्दीत महिला एक मोठी शक्ती म्हणून उदयास आले आहेत आणि त्याची जाणीव विरोधी पक्षांनाही झाली आहे. त्यामुळे संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या प्रती पाडणारे विरोधक आता या विधेयकाच्या समर्थनार्थ आले आहेत असे सांगताना मोदी यांनी सभा आणि बसपा सारख्या पक्षांना टोला लावला हे ऐतिहासिक विधेयक पारित करण्यासाठी संधी सरकारला मिळाली हे माझे आणि भाजपाचे भाग्य समजतो. देशाच्या उज्वल भविष्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि आम्ही ते घेतले आहेत. महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांमधील विश्वासात प्रचंड वाढ होईल आणि याचा फायदा देश आणखी मजबूत होण्याची होईल असे मोदी यांनी सांगितले.