तळोदा : मजुरीच्या कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना दलेलपूर गावात २८ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अशोक मदन धनका (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, दलेलपूर गावातील आरोपी ललित लल्लू धानका आणि मयत अशोक मदन धनका यांच्या मजुरीच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान, आरोपी ललित धांडका याने मयत अशोक मदन धनका यांच्या डोक्यात लोखंडी फावडाने मारहाण केली. यात अशोक यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत यांचा मुलगा कृष्णा अशोक धनका याने तळोदा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोप ललित विरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप करत आहेत.