मणिपूरात पुन्हा हिंसाचार उफाळला; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

मणिपूर मध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये मागील पाच महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरु असून अद्यापही मणिपूरमध्ये हिंसाचार कायम आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा हा हिंसाचार उफाळून आला आहे.

मणिपूरमध्ये जमावाने एका नेत्याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांची गाडीही जाळली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे.