तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। उत्तर प्रदेशातील मथुरा मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मथुरा जंक्शन येथे रेल्वेचा एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. शकूरबस्ती-मथुरा ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चदल्याची विचित्र अपघात झाला. मात्र या घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शकूरबस्ती रेल्वे स्टेशनवर ट्रेन येऊन थांबली. यानंतर प्रवासी ट्रेनमधून उतरत होते. अचानकच रेल्वे पुन्हा सुरु झाली आणि थेट प्लॅटफॉर्म तोडून वर चढली. रात्रीची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मजवळ ५ ते ६ जण उभे होते पण त्यांनी ट्रेन येताना पाहिली आणि तेथून पळ काढला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातात ओएचई लाईनचा एक खांब ट्रेनच्या समोर आला. दरम्यान एक 8 वर्षांचा मुलगा रेल्वेखाली आला. मात्र त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याचा रेल्वे अधिकारी आणि आरपीएफची टीम शोध घेत आहे.