तरुण भारत लाईव्ह ।१९ सप्टेंबर २०२३। मागच्या काही दिवसांपासून जोरात पाऊस सुरु आहे. मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. बंगाल खाडीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून राजस्थानमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गुजरातमधील उकाई धरणाचे १५ दरवाजे उघडल्याने काठावरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
आपत्ती निवारण विभागानुसार, राज्यातील माळवा व निमाड या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सुद्धा ही स्थिती कायम आहे. तसेच अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आल्याने सुमारे नऊ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत निमच आणि मंदसौरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या जनसंपर्क विभागानुसार, इंदूर, खंडवा, खरगोन, बडवानी, बुरहानपूर जिल्ह्यात एसडीआरएफकडून ८ हजार ७१८ नागरिक आणि२,६३७ पाळीव प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलविले गेले. सध्या बचावकार्यात ६१० एसडीआरएफ जवान आणि ८०१ गृहक्षक विभागाचे जवान तैनात आहेत.
गुजरातमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने गुजरातमधील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. त्याचबरोबर पुढील काही तासांत अहमदाबाद, महेसाना, गांधीनगर, पाटण, बनासकांठा, साबरकांठा, अरावली, महिसागर, पंचमहल, खेडा, आनंद, वडोदरा, दाहोद, छोटा उदेपूर, भरूच, नर्मदा, सुरत, तापी, देवभूमी द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, राजकोट, अमरेली, बोटाद, भावनगर, कच्छ, दीव या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.
दरम्यान, गुजरात सरकारने आज नर्मदा जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी बंद ठेवल्या. नर्मदा धरणातून पाणी सोडल्याने अनेक गावांना पाण्याने वेढा दिल्याचे चित्र आहे. तर, तापी नदीवरील उकाई धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले असून, काठावरील गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.