---Advertisement---

मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसला तरुण, तरुणीचे तोंड दाबले अन्… काय घडलं

---Advertisement---

जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अश्लिल चाळे करत तरुणीचा विनयभंग केला. शहरातील एका भागात गुरूवार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात २२ वर्षीय तरूणी ही मावशी व आजीसोबत वाास्तव्यास आहे. धुणीभांडीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. तरूणी ही मावशी व आजी यांच्यासोबत घरात झोपलेले असताना गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या परिसरात राहणारा मोन्या उर्फ सुमित सुधाकर बनसोडे हा घरात घुसला. त्यानंतर तरूणीचे तोंड दाबून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. त्यावेळी तिची मावशी व आजी झोपेतून जागे झाल्याने त्यांना पाहून सुमित हा पसार झाला.

दरम्यान, पिडीत तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मोन्या उर्फ सुमित सुधाकर बनसोडे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment