मध्य रेल्वेचा ‘या’ शहरादरम्यान नवीन गाडी चालविण्याचा निर्णय ; भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबेल

भुसावळ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून नवीन साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ दरम्यान नवीन रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १५१८२ एलटीटी-मऊ साप्ताहिक एक्सप्रेस १८.१२.२०२३ पासून दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता मऊ येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक १५१८१ मऊ-एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस १६.१२.२०२३ पासून दर शनिवारी २२.१५ वाजता मऊ येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ०३.४५ वाजता पोहोचेल.

या स्थानकावर असेल थांबा?

या गाडीचे थांबे एलटीटी, कल्याण, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फुलपूर, जंघाई, मडियाहुन, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगढ आहेत. , मुहम्मदाबाद आणि विल मऊ.

हा आहे ट्रेनचा तपशील

या ट्रेनमध्ये एकूण २१ एलएचबी कोच आहेत. ज्यामध्ये 2 AC II टियर, 6 AC III टियर इकॉनॉमी, 7 स्लीपर क्लास, 5 सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.