‘मनरेगा’ अंतर्गत नंदुरबार येथे 8वी/10वी पाससाठी शेकडो जागा रिक्त, त्वरित अर्ज करा

8वी/10वी पाससाठी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नंदुरबार येथे भरती निघाली आहे.

या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीअंतर्गत 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव : संसाधन व्यक्ती

शैक्षणिक  पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.

कसा कराल अर्ज?

-उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयाच्या वेबसाईवर प्रसिध्द करण्यात आला आहे.

-यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज   रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार या पत्त्य़ावर पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. कागदपत्रे सोबत नसलेले आणि अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा