दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना सोमवारी दिलासा मिळाला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना आठवड्यातून एकदा पत्नी आणि डॉक्टरांना भेटण्याची परवानगी दिली आहे. सिसोदिया यांच्या विनंतीवरून न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आणि त्यांना कोठडीत पॅरोल मंजूर केला.