मराठा आंदोलकांचा राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये राडा; नेमकं काय घडलं ?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य केलं. यानंतर जाब विचारण्यासाठी राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले. पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाताना दिसत आहे. ते राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाम आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य केलं. यानंतर जाब विचारण्यासाठी धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांनी भेट द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी मागणी होतेय.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी आतमध्ये बोलावल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणावरुन राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज यांनी केलं होतं. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत.