जळगाव : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण पुकारले असून राज्यातून त्याला विविध ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर जळगाव विभागातून पुणे, औरंगाबाद, सोलापूरसह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बसेसच्या तब्बल १७४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दोन दिवसांत महामंडळाचे तब्बल १५ लाखांचे उत्पन्न बुडाले. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात एसटी बसच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होत असते. मात्र यावर्षी दिवाळीपूर्वीच लांब पल्ल्याच्या बसेस फेन्या रद्द करण्याची वेळ आल्याने लाल परीचे उत्पन्न घटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाला ३० रोजी काही ठिकाणी हिंसक वळण लागले. जाळपोळ, बसेसचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक उत्तर महाराष्ट्रात शांततेचे वातावरण असून या विभागात बसेस नेहमीप्रमाणे फेन्या करत आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
सोमवारी वातावरण चिघळताच जळगाव आगारातून ये-जा करणाऱ्या पुणे, संभाजीनगर, सोलापूर, लातूर, बारामती, माहुरगड तसेच पंढरपूर येथील बसफेऱ्या तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी पहाटे ५ वाजेपासून पुन्हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. सायंकाळी ६ वाजेपर्यत २६५७८ किलोमीटर पर्यंतचे अंतर रद्द झाले. तसेच ६ लाख ६१ हजार ५२६ रुपयांचा आर्थिक फटका बसला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची बस नसल्याने गैरसोय झाली. अनेक प्रवासी आगारात बसेससाठी प्रतीक्षा करताना दिसले. अनेक प्रवाशांनी दुपारुन रेल्वे स्टेशन, खाजगी लक्झरी, अन्य वाहने मिळविण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसते.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने बसेस तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव विभागातून लांब पल्ल्याच्या फेल्या रद्द करण्याचा निर्णय सोमवार, ३० पासून घेतला. मंगळवारी सायंकाळपर्यंत ८० फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. आंदोलन मागे घेतल्यानंतर लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या जातील. जळगाव जिल्हा अंतर्गत तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई या बसेस फेन्या सुरू आहेत.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव