मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून याचिकेवर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आंदोलकांनी यापूर्वी सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या असतानाही त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण कोर्टात रद्द ठरवण्यात आलेलं होतं. आता पुन्हा त्यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. अहमदनगरमध्ये एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी उग्र आंदोलन होत असल्याने एस टी महामंडळाने वाहतूक बंद केली आहे. एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजवर परिणाम होत आहे. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने आणि एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.