मराठा आरक्षणाची क्रेझ आता विद्यार्थांमध्येही, काय घडलं

मुंबई : इयत्ता बारावीच्या सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर सोडविताना बीबी दारफळ येथील विद्यार्थ्याने ‘एक मराठा कोटी मराठा’ अशी सुरुवात करत उत्तरपत्रिका सोडवली आहे. सोशल मिडीयावर ही उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्याचे वातावरण तापले होते. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. याचीच क्रेझ आता विद्यार्थांमध्येही दिसत आहे.
सोलापूर येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित. श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात संकेत लक्ष्मण साखरे (वय १९) हा बारावीत शिक्षण घेत आहे. त्याने सहामाहीचा पेपर सोडविताना उत्तरपत्रिकेची सुरवात चक्क ‘एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली आहे. राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. पेपरची सुरुवातच त्याने ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली. त्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.