मराठा आरक्षण! जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला तोडगा काढण्यासाठी दिलेल्या मुदतीस दि. १४ ऑक्टोबरला ३० दिवस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे दि. १४ ऑक्टोबरपासून जरांगे-पाटील हे राज्यभर दौरा करून मेळावे घेणारे आहेत.

दरम्यान, याबाबत जालन्यामध्ये मराठा समाजाची विचार मंथन बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले, त्यांच्याकडे असे कोणतेही शक्ती नाही ज्याचा वापर करून ते मला फोडू शकतील असे सांगतानाच मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालू देणार नाही. तसेच, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दिलेल्या मुदतीत मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण सुरू करणार, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.