मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. दरम्यान, आरक्षणावरुन टीका होत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर थेट भाष्य केलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती, त्यावेळी ते बोलत होते.