मराठा आरक्षण ! राज्याने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही, असं का म्हणाले नारायण राणे ?

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाने संमिश्र मत वेगवेगळ्या स्तरातून व्यक्त केली जात आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच एक ट्वीट चर्चेत आहेत.

काय म्हणाले नारायण राणे ?
नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतं आहेत की,”मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन.”