मराठा आरक्षण! हिंसक वळण; आत्तापर्यंत किती जणांना अटक?

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला असून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. दोन दिवसांपुर्वी आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या घरावर हल्ले करण्यात आल्याने बीड आणि धाराशिवमघ्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
दरम्यान, बीड हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या जमावाकडून घरावर हल्ले करुन जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील ३०० लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
त्यापैकी आतापर्यंत १०१ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती बीडच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. तसेच यासंबंधी कारवाई सुरुच असून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आंदेलकांमध्ये अनेक तरुणांचा समावेश असून यापैकी बरेच जण राजकीय पक्षांशी संबंधित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. हिंसाचार करणाऱ्यांचा तपास आणखी सुरु आहे. तसेच आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.