मराठा मोर्चाच्या व्हिडिओवरुन संभाजीराजेंनी संजय राऊतांना झापले

नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवरून शिंदे गटाविरोधात बॅनर हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संजय राऊतांच्या एका व्हिडिओवरून संभाजीराजे छत्रपती संतापले असून, संजय राऊतांना झापले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा किती विशाल होता हे दाखवणारा व्हिडिओही ट्विट केला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून, मराठा मोर्चाचा असल्याचे सांगितले. यानंतर संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, संजय राऊत ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले.