मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही, कसं शक्य नाही ? भुजबळांनी पटवून सांगितलं

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देणे सध्या तरी महाराष्ट्र सरकारला शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी भुजबळांनी ते कसं शक्य नाही ? हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न केला. “महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही. ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचं म्हटलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्यावरही टीका केलीय.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. ओबीसींच  आरक्षण दिले जाणार नाही. चार आयोगांनी हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. हे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ५४ टक्के मोजले तर बिहारमध्ये ६३ टक्के आहे, बाकीच्या कमिशनवर माझा विश्वास नाहीय.

ओबीसी कोट्यातील अनेक भरती प्रलंबित
ते म्हणाले की, आम्ही 54 टक्के पेक्षा जास्त आहोत. तुम्ही मोजा. आम्ही 54 टक्के असून 27 टक्के आरक्षण दिलं आणि भरलं किती? 27 टक्के आरक्षणासमोर साडेनऊ टक्के आरक्षण भरलं. मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. विचारा शरद पवार, उद्भव ठाकरे यांना, मराठ्यांना कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर साधला निशाणा
“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि आपल्याल लोकांवर हल्ले करतात. तिथला नवा नेता हा मागच्या ऑगस्ट, सप्टेंबर दोन महिने मला शिव्या देत होता. मी काही बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरे जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळले, हल्ले केले, त्यांच्या बायका-पोरांचे जीव धोक्यात टाकले. त्यांच्या घरांची राखरांगोळी केली. त्यावेळी छगन भुजबळ तिथे गेला आणि सांगितलं की, छगन भुजबळ आता गप्प बसणार नाही. तुम्ही अशा रितीने ओबीसी आणि सर्वांना वेठीस धरु शकत नाहीत. तुम्हा लोकांची घरेदारे जाळण्याचे काय अधिकार आहेत?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.