मलाईदार बासुंदी रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। गणेशउत्सव सुरु असून रोज बाप्पाच्या नैवैद्यासाठी रोज स्पेशल काय करावं हा प्रश्न पडतो तर अशावेळी तुम्ही बासुंदी करू शकता. बासूंदी घरी करायला खूप सोप्पी आहे. बासुंदी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
दूध, साखर, वेलची पूड, बदाम, पिस्ता, चारोळी.

कृती 
सर्वप्रथम एका पातेल्यात दूध उकळत ठेवावे. दूध आटल्यानंतर साखर घालावी. त्यामध्ये नंतर बदाम, पिस्ता तसेच चारोळी घालावी. त्यानंतर परत दूध उकळत ठेवावे. यानंतर गॅस बंद करून घ्यावा. नंतर त्यात वेलची पूड घालावी. बासुंदी तयार झाल्यावर बासुंदी फ्रीझ मध्ये थोडावेळ ठेवावी यामुळे बासुंदी घट्ट होईल.