Nauvari saree song : सोशल मीडियावर रोज नवीन ट्रेंड येत असतात. कधी एखाद्या फोटोचा ट्रेंड येतो तर कधी रील्स बनवण्याचा. गेल्या काही महिन्याांत अनेक मराठी गाण्यावर रील्स बनण्यात आले. अशाच आणखी एका भन्नाट अशा मराठी गाण्यानं सध्या नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.
कोणतं गाणं?
सध्या सोशल मीडियावर ‘नऊवारी’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांतच या गाण्याने मिलिअन प्रेक्षकांची मने जिंकली.
आता वाचा गीतकार संजू राठोडची कहाणी!
महाराष्ट्रातील धानवड तांडा येथील तरुण त्याच्या बाप्पाच्या भक्ती पोटी आणि बाप्पाच्या गाण्याने केलेल्या करिअरच्या सुरुवातीने तो संपूर्ण भारतभर पोहोचला आहे. असा हा गायक, संगीतकार, गीतकार म्हणजे संजू राठोड. संगीत क्षेत्रात येण्याआधी कोणताही वारसा नसताना संजूने स्वमेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली. संजूच्या लोकप्रिय झालेल्या गाण्यांना संजूच्या स्वप्नांना सत्यात उतरवलं.सध्या सोशल मीडियावर ‘नऊवारी’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचा गायक, संगीतकार दुसरं तिसरं कोणी नसून संजू राठोड आहे.
‘नऊवारी’ अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. मिलियन व्यूजचा टप्पा पार करणं हे काही संजूसाठी सोप्प नव्हत. सुरुवातीच्या काळात संजूनेही बराच स्ट्रगल केला. गाणी बनवण्यात मधल्या काही काळात खंड ही पडला मात्र बाप्पाच्या कृपेने, गणेशोत्सवात पुन्हा एकदा ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’ हिट झालं. २० वर्षीय, संजूचा भाऊ गौरव राठोड (जी स्पार्क) याच्या सोबतीने दोघांनी एकापेक्षा एक मराठी गाणी तयार केली. शिवाय संजू आणि गौरव राठोड सोबत प्राजक्ता घाग, मनिष महाजन आणि ‘नऊवारी’ गाण्याच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीने तयार झालेल्या या गाण्याने २० मिलियनचा टप्पा पार केला आहे तर स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर १ मिलियन स्ट्रीम्स मिळाले आणि इन्स्टाग्रामवर ४००K पेक्षा जास्त लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे.