‘मला पोहे हवे’, नवऱ्याने दिले ड्रायफ्रुट्स; पत्नीनं उचललं ‘हे’ पाऊल

लग्नानंतर पती-पत्नी अनेक स्वप्नं जपतात. नवीन लग्नात दोघेही एकमेकांची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात. कारण तो काळ एकमेकांना समजून घेण्याचा असतो. पती-पत्नीच्याही अपेक्षा असतात, ज्या सहसा लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा असते, पण कधी कधी हट्टीपणा या नात्याला वेगळे वळण देतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे पतीने पोहे बनवून दिले नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केलीय.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बालकिशन आणि कविता यांचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होत. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघांनी प्रत्येक लहान-मोठ्या गरजांची प्रत्येक पावलावर काळजी घेतली. दोघेही खूप खुश होते.

दरम्यान, पत्नीने तिच्या पतीला सांगितले की ‘तिला पोहे खायला खूप आवडते, त्यामुळे त्याने तिच्यासाठी चांगले पोहे बनवावेत’. पतीने पोहे बनवण्यास नकार देत पत्नीला घरी ठेवलेला सुका मेवा खाण्यास सांगितले. यामुळे पत्नीला पतीवर प्रचंड राग आला आणि तिने थेट राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या पाऊलामुळे सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, अस कृत्य खरच कोणी करू शकत का ?

बालकिशनने पोहे बनवण्यास नकार दिल्यानंतर कविता चिडली आणि या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि कविताने खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला, बराच वेळ ती बाहेर न आल्याने बालकिशनने दार वाजवले आणि अलार्मही लावला.

त्यानंतरही दरवाजा न उघडल्याने बालकिशनने दरवाजा तोडला आणि समोर पाहिले असता कविता फासावर लटकलेली होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कविताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.